Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सायकल स्नेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली पक्षी आणि प्राण्यासाठी चारा व पाणपोईची व्यवस्था

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गाचीरोली, दि. २० एप्रिल :  गडचिरोली शहरातील गुरवडा रोडवरील पहिल्या नाल्याजवळ असलेल्या वृक्षाखाली आज सायकल स्नेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून उन्हाळ्यातील पाण्याच्या दूर्भिक्षतेमुळे पक्षी आणि प्राणी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात याची जाणीव ठेवून ती दूर करण्यासाठी पाॅलीथीनचा वापर करून त्यात जवळपास ६५ ते ७० लिटर पाण्याची सोय करून देण्यात आली.

सोबतच पक्षासाठी चाऱ्याची सुद्धा कमतरता पडू नये म्हणून तांदूळ तथा इतर कडधान्याची पाण्याशेजारी व्यवस्था केली. पाणी साठवून ठेवण्यासाठी बी जे ट्रेडर्स चे प्रोप्रायटर्स फिरोजभाई पठाण यांनी पाॅलिथीन देऊन सहकार्य केले. जी मंडळी गुरवडा रोडने सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी  खाली हाताने न जाता सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे व पक्षी तथा प्राण्याचे अनमोल प्राण वाचविण्यासाठी सायकल स्नेही मंडळाच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सायकल स्नेही मंडळाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर, उपाध्यक्ष तथा महा अंनिस चे सदस्य विलास निंबोरकर, कार्याध्यक्ष तथा सर्पमित्र प्रा विलास पारखी, सहसचिव प्रमोद राऊत, सर्प मित्र किशोर पाचभाई, प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य भांडेकर, प्रा. अविनाश गौरकर, राजू बैस, बालसदस्य मोहीत देशमुख आदी उपस्थित होते. रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांनी या नवोपक्रमाचे स्वागत करुन अभिनंदन मानून आभार व्यक्त केले.

हे देखील वाचा : 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.