Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमनानी मित्र परिवारांनी गणेश उत्सवात चालविलेले उपक्रम कौतुकास्पद.

माजी आमदार हरिराम वरखडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: गणेश उत्सव हा आरती, पूजाअर्चा पुरता मर्यादित न ठेवता दरवर्षी भोलू भाऊ मित्र परिवाराच्या वतीने गणेश उत्सवात विविध उपक्रम राबविले जातात त्यात कबड्डी स्पर्धा भजन स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून सोमनानी मित्र परिवाराने गडचिरोली जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार हरिराम वरखडे म्हणाले ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी उद्घाटक म्हणून सरपंच संगीता पेंदाम तर प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव गेडाम उपसरपंच भास्कर बोडणे सुकाळ्याचे सरपंच अविनाश कन्नाके कोजबीच्या माजी सरपंच वैशाली डोंगरवार दत्तू सोमनकर माजी उपसभापती विनोद बावनकर ग्राम पंचायत सदस्य आदेश आकरे सत्यदास आत्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव दुमाने मुखरु खोब्रागडे नलिनी सहारे नलू आत्राम वैशाली कांबळे नेताजी नेवारे पांडुरंग बावनकर मधू सोमनानी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक प्रदीप बोडणे तर प्रास्ताविक रामदास डोंगरवार यांनी केले शितल सोमनानी यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले कार्यक्रमाकरिता वैरागड व परिसरातील बहुसंख्या नागरिक व कबड्डी प्रेमी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.