Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज पासुन खुले करण्यात आले मुंबई विद्यापीठातील जैवविविधता पार्क

मियावाकी सिटी फॉरेस्ट, फुलपाखरू उद्यान आणि नक्षत्र उद्यान अशी तीन सुंदर उद्याने करण्यात आली खूली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 17 ऑक्टोबर :- मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने कलिना संकुलात तयार करण्यात आलेले जैवविविधता पार्क आजपासून खुले करण्यात आले. मियावाकी सिटी फॉरेस्ट, फुलपाखरू उद्यान आणि नक्षत्र उद्यान अशी तीन सुंदर उद्याने खूली करण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव सुधीर पुराणिक, एचडीएफसी एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवनीत मुनोत, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री विनीत भटनागर यांच्या उपस्थित आजचा उदघाटन सोहळा पार पडला. मियावाकी जंगल, सेन्सरी पार्क, पक्षी निवारा, फुलपाखरांचे गार्डन आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून एकराहून अधिक जागेवर हे जैवविविधतेचे अनोखे रुप साकारले आहे. त्याचबरोबर तलावाचे सौंदर्यकरणही करण्यात आले आहे. या प्रकल्पाला रोटरी क्लबच्या माध्यमातून एचडीएफसी एएमसीचे अर्थसहाय्य लाभले आहे.

“पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करायचे असेल तर जैवविविधता ही आजची आणि उद्याचीही महत्त्वाची गरज आहे. जैवविविधता हे निसर्गाने कोणत्याही आपत्तीविरोधात आपल्याला दिलेले सुरक्षाकवच आहे. या विविधतेमध्ये पृथ्वीवरील सर्व स्तरावरील विविध प्रकार सामावलेले असतात आणि त्यातून जीवनाला सार्थ ठरविणाऱ्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक प्रक्रिया घडत जातात. त्याचमुळे पर्यावरणाचे संरक्षण हा केवळ भावनिक वा सौंदर्यात्मक मुद्दा नाही तर मानवाला आणि संपूर्ण परीसंस्थेसाठी तो कळीचा मुद्दा आहे,” असे उद्गार रोटरी इंटरनॅशनल डीस्ट्रीक्ट ३१४१ चे गव्हर्नर श्री संदीप अगरवाला म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (आरसीबी)ने मुंबई विद्यापीठाबरोबर १० वर्षांचा सामंजस्य करार केला असून त्याद्वारे एक एकरहून अधिक जमिनीवर असलेले हे पार्क सांभाळले जाणार आहे. त्यासाठी मेगा स्केप इंडिया (एमजीएस)ला तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन भागीदार नेमले असून त्यातून हे पार्क उभे राहिले आहे. एमजीएसमध्ये अनेक पर्यावरणतज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जातात. अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने हे पार्क त्यांनी साकारले आहे.

‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’चे विनीत भटनागर म्हणाले, “नागरी भागातील नैसर्गिक स्त्रोतांचे नाविन्यपूर्ण व सकारात्मक दृष्टीने लक्ष घालत संवर्धन करणे, या दृष्टीकोनातून कलिना बायोडायव्हर्सीटी पार्कची निर्मिती झाली आहे. वनस्पती आणि प्राणी विविधता यातून आरोग्यपूर्ण परिसंस्था निर्माण होते. शहरी भागाचे पर्यावरण सुधारण्यासाठी बायोडायव्हर्सीटीचा उपयोग होतो आणि त्यातून शिक्षण, सांस्कृतिक व संवर्धानात्मक उपक्रमांना चालना मिळते. त्यातून शहर आणि लोकांपर्यंत जैवविविधता पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने रोटरी क्लबच्या सहाय्याने हाती घेतलेला हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असल्याचे प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्याने राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार!

पाणीसाठा करण्यासाठी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.