Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी विद्यापीठाचा परिसर विविधांगी रंगानी फुलला, नवीन वर्षाचे स्वागत करणारी मनमोहक फुले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि ०१ जानेवारी: फुलोंके रंगसे… दिल की कलम से…! साहित्यिक, कविंपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं,  ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य, सुंदर, सुवासिक, रंगीत फुलांचे साऱ्यांनाच आकर्षण म्हणूनच की काय फुलं ही सदिच्छा, शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती या भावनांचे ‘टोकन’ झाले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या फुलशेतीच्या विविध प्रक्षेत्रातली बहरुन आलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदिच्छा आणि शुभेच्छांचे ‘टोकन’ असलेल्या फुलांची शेती आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन या व्यतिरिक्त फुलांची सजावट, विक्री, फुलमाळा बनवणे यातून एक मोठी चलनवलनाची ‘माळ’ गुंफली जाते. शेवंती, गुलाब, निशिगंध, मोगरा, दहेलिया, गॅलार्डिया, ग्लॅडीओलस अशा अनेक देशी विदेशी फुलांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाची फुलशेती सध्या बहरुन आली आहे. या विभागातून मिळणारे प्रशिक्षण, सेवा या जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.

सध्या शेवंती बहराला आहे. त्यामुळे शेवंतीचे विविध रंगी, आकारांचे ताटवे ओळीने बहरुन आले आहेत. हे दृष्य नयनरम्य ठरतंय. सोबतच गुलाब, बिजली, एस्टर,  निशिगंध असे विविध प्रकारच्या फुल पिकांची लागवड करुन त्यांच्या विविध जाती विकसित करण्याचे काम येथे केले जाते.  त्यावर संशोधन केले जाते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या केंद्रात शेवंतीचे पाच रंगांमध्ये १०० हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. रागिणी नावाचं स्वतंत्र वाणही विकसित केलंय. गुलाबाच्या १५० हून अधिक प्रकार, जाती आहेत.  ग्लॅडीओलसचे ५० प्रकार आहेत. निशिगंध च्या १२ जाती आहेत. मोगऱ्याच्या आठ,  कुंदाच्या सहा, अबोलीच्या पाच, झेंडूचे तीन, दहेलियाच्या १३० प्रकार आहेत. या शिवाय विविध प्रकारचे सावलीत लावता येणारी शोभेची रोपे, शोभेचे निवडूंग, कमी जागेत विकसित करण्यासाठी व्हर्टिकल गार्डनसाठी लागणारे रोपे,  प्रांगणे सुशोभित करण्यासाठी लागवड करावयाच्या हिरवळीचे सात प्रकार येथे उपलब्ध आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.