Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांच्या मदतीमुळे मिळाला रोजगार

  • शेतकऱ्याला उन्हाळ्यात भाजीपाला पीक लागवडीसाठी दिले प्रोत्साहन.  
  • लाहेरी पोलिसांनी शेतकऱ्याला इंजनसाठी डिझेल, शेतीसाठी बी-बियाणे आणि इतर मदत करून शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाल्याच्या पिकवला मळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. १९ मार्च: भामरागड तालुक्‍यातील लाहेरी पोलिसांनी माणुसकी दाखवत सुधाकर कोवासे नामक शेतकऱ्याला इंजनसाठी डिझेल, शेतीसाठी बी-बियाणे आणि इतर मदत करून शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाल्याच्या मळा पिकवला आहे. यामुळे शेतकरी कुटुंबास रोजगार प्राप्त झाला आहे.

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग म्हणजे लाहेरी. या भागात गडचिरोली पोलीस नागरिकांसाठी विविध कामे करून देवदूत ठरले आहेत. कधी रोजगार मिळावे तर कधी आरोग्य मिळावे अशा विविध माध्यमातून लोकांची कामे लाहेरी पोलीस करत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतात योग्य मार्गदर्शनाअभावी उन्हाळ्यात कोणते पीक घेत नव्हते. हे लक्षात घेऊन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगांवकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुधाकर कोवासे नामक शेतकऱ्याला बी-बियाणे दिले, इंजिन साठी डिझेल दिले इतर काही मदत केली आणि भाजीपाला पीक लागवडीसाठी प्रोत्साहन दिले.

विशेष म्हणजे बाजारात जर भाजीपाला पिकाला भाव मिळाला नाही तर स्वतः पोलिस ठाण्यांमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेतला जाईल. याची हमी सुद्धा दिली आणि बघता बघता शेतकऱ्याचे शेतात आज हिरवेकंच भाजीपाला पिकांने भरले आहे. ही किमया करणाऱ्या गडचिरोली पोलिसांचे आभार मानायला शेतकरी विसरला नाही.  

पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची संकल्पना, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शन, पोहवा तुकाराम हीचामी, पोशी ईश्वरलाल नैताम, डेव्हिड चौधरी यांची मदत घेत प्रभारी अधिकारी अविनाश नळेगांवकर, पोलीस उपनिरीक्षक अजय राठोड, विजय सपकाळ, महादेव भालेराव व अंमलदार आणि पोलीस जवानांनी हा अभिनव प्रयोग मार्गी लावला आहे.

    

Comments are closed.