ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..
शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर तथा माजी खासदार सतीश प्रधान वयाच्या ८४ व्या वर्षी रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी शिवसेनेच्या जडनघडणीत मोलाची भूमिका बजावलेली होती.
सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता ते ठाणे शहराचे पहिले महापौर झाले होते. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी १९८० साली ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापन केली होती. राज्यसभेत शिवसेना पक्षाचे नेते झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावलेली आहे. ते ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर असून शिवसेनेचे माजी खासदार सुद्धा झाले आहेत. बाबरी मस्जिद प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले होते.
त्यांनी कोर्टात बयान देताना म्हटले होते की , “मी लालकृष्ण अडवाणी आणि मनोहर जोशी यांना जमावाला नियंत्रित करताना, त्यांना शांत करताना आणि पुढे जाण्यापासून रोखताना पाहिले होते. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता, जमावाच्या उद्रेकामुळे बाबरी मशीदची घटना घडली.” त्यामुळे त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचचार सुरु असताना वयाच्या ८४ व्या वर्षी रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
हे पण पहा,
सीसीआयकडून खरेदी केंद्र मंजूर : हमी भावाने कापूस विकण्याचा मार्ग मोकळा !
Comments are closed.