Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनांचे संरक्षण करण्यात वन विभागाची उदासीन!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

रोहा, 13 ऑगस्ट – झाडे लावा झाडे जगवा असे शासनाचे धोरण आहे यासाठी वृक्षदिन साजरा केला जातो दरवर्षी कोटयवधीचा खर्च वृक्षलागवडीसाठी केल्याचे वनमंत्र्याकडून सांगण्यात येते वृक्षलागवड झाली अथवा नाही यासाठी जिओ टॅगिग देखील करण्यात येते परतू लावलेल्या झाडापैकी किती झाडे जगली व किती मृत पावली याची आकडेवारी मात्र कधीच दिली जात नाही वनाचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती झाली आहे पण वनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणा-या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये व अधिकारी वर्गात देखील वनसंरक्षणाबाबत उदासीनताच असल्याने वृक्षतोडबाबत गुन्हे दाखल होऊनही आरोपीना शिक्षा होत नाही

वीटभट्टी बांधकाम व कोळसा व्यावसायिकांकडून मोठया प्रमाणात होणारी वृक्षतोड ही चितेची बाब ठरत आहे जंगल सपाटीकरण करताना पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वेगळ्या मार्गाने वळविल्यामुळे देखील जंगलाची हानी होत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांतनी वेळोवेळी वनविभागाचे लक्ष वेधले आहे पण भ्रट वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी याप्रकरणी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे रायगड जिल्ह्यात खैराची मोठया प्रमाणात तोड हि भ्रष्ट अधिकरीवर्गाच्या संगनमत करून खैराची तस्करी होत आहे तसेच या घोळमाळ करणा-या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्वन आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वनविभागाच्या परवानगी घेऊन वृक्षतोड करण्यात येते त्यामध्ये काही मोठया प्रमाणात बोगसगिरी केली जात असताना तक्रारदार यांना वनविभाग कडून समधानकारक उत्तर मिळत नाही तसेच राखीव वन तोडला की कर्मचारी स्वाताची कातडी वाचवणेसाठी शेतक-याच्या खाजगी क्षेत्रावर बोट दाखवून बचाव करतात आणि वनविभाग क्रोॅस चेकीन करुन स्वाताची पाट थोपटता या विषयावर राज्याच्या वनमंत्र्यानी स्वाता लक्ष देवून कर्मचारीवर्ग व अधिकरी वर्गवर अंकुश ठेवून उच्चस्तरीय चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.