Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जोशी, वंजारी, रोंघे, वानखेडेंचे भाग्य पेटीबंद.

नागपूर पदविधर निवडणुकीसाठी ६० टक्के मतदान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. १ डिसेंबर: नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज १ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतदान सुरू झाले. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त झालेली नाही. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहेत.
ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे संदीप जोशी, काँग्रेसचे अभिजित वंजारी, वंचित बहुजन आघाडीचे वाहुल वानखडे, विदर्भवादी नितीन रोंघे, परिवर्तन पॅनेलचे प्रशांत डेकाटे, बहुजन आघाडीचे अतुल खोब्रागडे आदींमध्ये लढत झाली. एकंदर १९ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मतदान केले.
 या उमेदवारांचे भाग्याचा फैसला येत्या गुरुवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. विधानपरिषदेत पक्षीय बलाबलाच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. २ लाख ६ हजार मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी विभागातील ३२२ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते ४ दरम्यान ५३.६४
टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी दिली. नागपूर (५३.९१),
भंडारा (५७.७७), चंद्रपूर (५४.१६), गोंदिया (५०.८०), गडचिरोली ( ४०.५४), वर्धा (५७.५९ टक्के ) अशी मतदानाची दुपारपर्यंतची आकडेवारी होती. सकाळी ८ वाजता विभागात मतदानाला सुरुवात झाली. नवमतदारांमध्ये मतदानाची उत्सूकता दिसून आली. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ठिकठिकाणी बुथ उभारण्यात आले आहेत. स्थानिक नेते,पदाधिकारी फिरुन प्रत्यक्षात अधिकाधिक मतदान व्हावे यादृष्टीने धडपड करतांना पहायला मिळाले. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग वाढत असताना कोव्हिड सुरक्षा नियमांचे पालन करून, ही निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते ५ आहे. विभागात २ लाख ६ हजार ४५४ मतदार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.