Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी

अहेरी उपविभागात पूरस्थिती निर्माण झाल्याने आरोग्य विभागाने औषधी भांडार तयार करावा .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि, 23 जुलै :-  अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली असल्याने अहेरी, सिरोंचा ,मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड या पाचही तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून यामध्ये विशेष करून मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याला जास्त फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या गावांना पिण्या योग्य पाणी नाही, गावात चिखलाचे साम्राज निर्माण झाल्याने डासाची निर्मिती होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.  यामुळे विविध आजार निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळेवर औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी अहेरी येथे औषधीचे भांडार निर्माण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाजी गोवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अहेरी उपविभागातील अतिवृष्टी झालेल्या गावांना वेळेवर औषध उपचार पोहोचविण्यासाठी औषध भांडारसाठा निर्माण नसल्याने तसेच पाचही तालुके नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल असून, जिल्हा मुख्यालपासून साधारणता 120 ते 220 कि.मी. अंतरावरून  तालुक्याची मुख्यालय आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना आवश्यकते नुसार जिल्हा मुख्यालयातील औषध भांडारातून औषधी घ्यावी लागते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा मुख्यालय ते दक्षिण गडचिरोली येथील तालुका मुख्यालयाचे अंतर पाहता औषध साठा घेतलेले वाहन त्यांचे मुख्यालयात पोहचायला 3 ते 6 तासाचा अवधी लागत असून. आरोग्य विभागाच्या औषध साठवनुकीच्या मानकानुसार औषधी हि ठरावीक तापमानातच ठेवणे गरजेचे असते. परंतु जिल्हा मुख्यालयापासून दक्षिण गडचिरोली पर्यंत औषधी वाहतुक करीत असताना आरोग्य विभागाकडे वातानुकुलीत सर्वतोपरी सुसज्ज  वाहन उपलब्ध नसल्यामुळे ठरविलेल्या मानकाचा भंग होवुन औषधी निकामी होण्याची शक्यता निर्माण होवु शकते. त्यामुळे सामान्य परिस्थितीत जिल्हा मुख्यालयापासून औषधी आणने आरोग्य विभागाच्या तालुकास्तरीय अधिकायांना शक्य जरी असले, तरी पुरपरिस्थिती सारखी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास, दक्षिण गडचिरोली तालुक्याचा संपर्क पूर्णपणे जिल्हा मुख्यापासून तुटतो. अशा वेळी जिवनावश्यक औषधीसाठा दक्षिण गडचिरोली तालुक्याना पुरवठा करणे शक्य होत नसल्याची प्रचिती व प्रत्यक्ष अनुभव सद्या उद्भवलेल्या पुरस्थितीत आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासनास निश्चितच झालेल्या अतिवृष्टीवरून लक्षात आले.

त्यामुळे दक्षिण गडचिरोली मधील 5 तालुक्याना आवश्यक औषधीसाठा वेळेवर पोहचविण्यासाठी जिल्हाचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या “अहेरी” येथे प्रशस्त व सुसज्ज औषधी भांडार जिल्हा नियोजना अंतर्गत अनुदानातून तयार करण्यासाठी प्रस्ताव पारीत करुन कृपया औषध भांडार गृह तयार करून अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यात जवळपास अंतर असलेल्या अहेरी येथे औषधीभांडार निर्माण करून अहेरी उपविभागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून औषध भांडाराची मागणी करून लक्ष वेधले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.