Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वातून गरीब बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया व जनजागृतीचा अभिनव उपक्रम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई २७ जुलै :“दुभंगलेल्या ओठांवर हसू परत आणायचं आहे…” — ही केवळ एक वैद्यकीय कामगिरी नाही, तर एका संवेदनशील नेतृत्वाच्या मनात दाटलेलं स्वप्न आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील हजारो गरीब बालकांच्या चेहऱ्यांवर पुन्हा एकदा हसू फुलवण्यासाठी सुरू केलेली ‘महा स्माईल्स’ मोहीम ही केवळ उपचारांची नाही, तर मानवी स्पर्शाची एक आश्वासक चळवळ ठरतेय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गरीब कुटुंबांतील बालकांना भेडसावणारा दुभंगलेला ओठ (क्लेफ्ट) आणि फाटलेला टाळू (पॅलेट) या जन्मजात व्यंगावर वेळेवर उपचार न झाल्यास बोलण्यात, ऐकण्यात अडथळे, आणि सामाजिक एकाकीपणा निर्माण होतो. या अडचणींवर उपाय शोधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ सरकारी सिस्टिमपुरतेच थांबले नाहीत, तर स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट समाजभान यांना एकत्र आणत एक ‘मिशन मोड’ मोहिम उभी केली आहे.

या भावनिक आणि वैद्यकीय लढ्याला साथ मिळाली ‘स्माईल ट्रेन इंडिया’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेची आणि बजाज फिनसर्वच्या सामाजिक उत्तरदायित्वाची. बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनीही या मोहीमेला उभारी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘महा स्माईल्स – क्लेफ्ट जनजागृती व उपचार मोहीम’ विदर्भात पूर्णपणे मोफत राबवली जाणार असून, तिचा शुभारंभ ३१ जुलै रोजी नागपूरमधील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी येथे होणार आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ‘स्माईल्स’ची मोहीम..

या पहिल्यावहिल्या उपक्रमात तीन विशेष मोबाईल व्हॅन पुढील ९० दिवसांपर्यंत ११ जिल्ह्यांत फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करतील. बालकांमध्ये क्लेफ्ट विकाराची लवकर ओळख, तपासणी, शस्त्रक्रियेची तयारी आणि नोंदणी या सगळ्या टप्प्यांची मोहीम राबवली जाईल. नागपूर, अकोला, गोंदिया आणि वर्धा येथील विशेष रुग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

हा विकार जवळपास ७०० पैकी एका बालकात आढळतो. वेळेवर निदान झालं, तर केवळ ६-७ शस्त्रक्रियांनी हे व्यंग कायमचं दूर करता येतं. पण ही शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असून, अनेक आदिवासी, ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना ती परवडत नाही. ही बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण उपचार शंभर टक्के मोफत करावेत अशी दूरदृष्टी ठेवत ही मोहीम कार्यान्वित केली आहे.

मातृभूमीच्या लेकरांना पुन्हा हास्य लाभो..

क्लेफ्ट विकार असलेली हजारो बालकं अजूनही गप्प आहेत… त्यांच्या ओठांमध्ये शब्द नाहीत, आवाज नाही… पण या मोहिमेमुळे त्यांना केवळ भाषा नव्हे, नवजीवन लाभणार आहे.

गावखेड्यांमधील, वाडीपाड्यांतील, आणि आदिवासी भागातील त्या निष्पाप चेहऱ्यांना आता नुसतंच उपचार नाही, तर माणुसकीचा आधार लाभतो आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, “एकही बालक केवळ पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहता कामा नये… ‘महा स्माईल्स’ मोहिम म्हणजे शासन आणि समाजाच्या संयुक्त जबाबदारीचा एक आदर्श नमुना आहे.”

राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे की मृत्यूचे सापळे? आलापल्ली – सिरोंचा मार्गावरील नागरिकांचे जीवन संकटात; प्रशासनाची कानाडोळा भूमिका कायम

सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव

Comments are closed.