Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुणबी समाजाची मोठया उत्साहात सभा संपन्न

रायगड जिल्हा समन्वय समितीवर उपाध्यक्ष शंकर भगत, सरचिटणीसपदी शिवराम महाबळे यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

रायगड, ,13 मार्च :- रोहा तालुक्यात कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा यांची तालुका कार्यकारिणी सदस्य व सर्व ग्रुप अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माजी आमदार स्व पा रा सानप कुणबी भवन रोहा येथे मोठया उत्साह सभेचे आयोजन करण्यात आलं. 

यावेळी रोहा तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  कार्यकरणी सभा संपन्न झाली.यावेळी रायगड जिल्हा कुणबी समाज समन्वय समितीवर नव्याने निवड झालेले उपाध्यक्ष शंकरराव भगत,तसेच रायगड कुणबी समाज समन्वय समिती सरचिटणीसपदी शिवराम महाबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वांनुमते अभिनंदन ठराव घेत त्यांचे जाहीर सत्कार करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . त्याच बरोबर समाज नेते शंकरराव म्हसकर यांची रायगड जिल्हा कुणबी समाज समन्वय समिती सल्गारपदी, तर ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, माजी सभापती पं.स रोहा.रामचंद्र सकपाळ यांची रायगड जिल्हा कुणबी समाज समन्वय समिती कार्यकारिणी सदस्य निवड झाल्याबद्दल त्यांचे देखील यावेळी या सभेत विशेष सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच कुणबी समाज युवक मंडळ अध्यक्ष अनंत थिटे, कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स रोहा तालुका संघटक पदी निवड झाली आहे.तसेच माजी अध्यक्ष रायगड जिल्हा कुणबी समाज युवक मंडळ महेश बामुगडे यांची कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स रोहा तालुका उपसंघटक पदी निवड झाली.तसेच कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स रोहा तालुका उपसंघटक पदी शशिकांत कडू निवड झाल्याबद्दल त्यांचे देखील सर्वानुमते अभिनंदन ठराव घेत उपस्थित सर्व समाज नेते यांच्या शुभहस्ते त्यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.

मोठया उत्साही आणी अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या सभेस रोहा तालूका कुणबी समाज उपाध्यक्ष मारुती खांडेकर, उपाध्यक्ष गोपीनाथ गंभे, कुणबी समाज सरचिटणीस रोहा तालुका दत्ताराम झोलगे, माजी सरचिटणीस सुनिल ठाकुर, सुहास खरीवले, माजी अध्यक्ष कुणबी समाज मधुकर ठमके, समाज नेते बाबुराव बामणे, धाटाव ग्रुप अध्यक्ष गुणाजी पोटफोडे,ऐनघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे, सोनगाव ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाळ, काशीनाथ भोईर, सतीश भगत, शशिकांत कडू, राजेंद्र शिंदे, यशवंत रटाटे, विष्णू लोखंडे, मोरेश्वर खरीवले,परशुराम भगत, ज्ञानेश्वर दळवी, महेश तुपकर, तुकाराम पाखर, यशवंत मोंडे,आदी तालुक्यातील सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना असे सांगितले की आपल्याला जातीच्या दाखल्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,समाजकल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत व त्यांच्या समावेत मंत्रालयात बैठक झाली पाहिजे. यासाठी कुणबी समजोन्नोती संघ मुबंई चे अध्यक्ष भुषण बरेसाहेब, तालुक्यातील आपण सर्व समाज नेत्यांनी अधिक प्रर्यंत केल पाहिजे. तसेच समाज नेते सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की आपण सर्वांनी संघटीत होऊन आपले मूलभूत व सामाजिक प्रश्न सोडवू शकतो आपणा सर्वांच्या साक्षीने राबवले गेलेले कुणबी जोडो अभियान यशस्वी झाले आहे. त्यामुळे आपल्या समाजातील तरुण पिढी साठी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेची राज्यात स्थापना करण्यात आली आहे. याचा फायदा रोहा तालुक्यातील तरुण व्यावसायिक समाज युवक बांधव व शिक्षणासाठी होणार आहे.

तसेच सभेचे अध्यक्ष रोहा तालुका कुणबी समजोन्नोती ग्रामिण शाखा अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कुणबी समाज शाखा कोलाड, कुणबी समाज शाखा धाटाव, विष्णू लोखंडे, कुणबी समाज चणेरे यांचे विषेश कौतुक केले.कुणबी जोडो अभियान यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.त्याबद्दल आभार मानले तसेच सर्व समाज कार्यकारणी सदस्य,नव्याने जिल्ह्यावर नियुक्त झालेले पदाधिकारी तसेच विविध सामाजिक सेवेतील पदावर नियुक्त झालेले पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस अधिक अधिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवराम महाबळे, शंकरराव भगत, रामचंद्र सकपाळ, अनंत थिटे, यांनी आपले मनोगत व्यक्त केल व शेवटी आभार दत्ताराम झोलगे यांनी मानले व सभेची सांगता करण्यात आली.

हे पण वाचा :-

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.