VIDEO: वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली.
दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वसई ११ जुलै :- वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईपलाईन फुटली. आज सकाळी५:३० वाजता मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत ढेकाळे आणि वाघोबा खिंडीदरम्यान ही पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे दुरुस्ती चे काम सुरू करण्यात आले असून पावसाची संततधार आणी लिकेज झालेले ठिकाण जंगल पट्यात असल्याने दुरुस्ती साठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सूर्या धरणाच्या जुन्या योजनेचे पाणी दिवसभर शहरात बंद राहील असे वसई विरार शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सदर पाईप लाईन दुरुस्ती साठी अंदाजे १२/१४ तास लागणार असून दुरुस्ती नंतर जुन्या लाईन चे पाणी शहरात येण्यासाठी पुढील ५/६ तास लागू शकतात, ह्या कारणांमुळे आज दिनांक ११/०७/२०२२ सोमवार रोजी सूर्या धरणाच्या जुन्या योजनेचे पाणी दिवसभर शहरात बंद राहील, नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू असला तरी जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने आज शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :-
मोठी बातमी ! शिंदे सरकारला मोठा दिलासा.
ताडोबातील प्रसिद्ध “माधुरी” व “तारू” वाघाच्या जोडीने दिले दर्शन…..
 
						 
			 
											


Comments are closed.