Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देव मार्कंडा मंदिराच्या रखडलेल्या जीर्णोद्धारास गती!

खा. डॉ. किरसान यांची थेट पाहणी; पुरातत्त्व विभागाला स्पष्ट सूचना...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक देव मार्कंडा मंदिराचा जीर्णोद्धार तब्बल दहा वर्षांपासून रखडले असून, कामाच्या धीम्या गतीमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही बाब गांभीर्याने घेत खा. डॉ. नामदेव किरसान यांनी नुकतीच मार्कंडा येथे भेट देऊन सुरू असलेल्या पुनर्बांधणी कामाची थेट पाहणी केली.

यावेळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर व गतीवर चिंता व्यक्त केली आणि लवकरात लवकर दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यापूर्वीही त्यांनी मंदिर परिसरात बैठक घेऊन तातडीने काम पूर्ण करण्याचा आग्रह धरला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, काम रखडल्यामुळे हरनघाट येथील मुरलीधर महाराज यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जनजागृतीचा उपक्रम हाती घेत १०८ दिवसांची पदयात्रा सुरू केली आहे. याची माहिती मिळताच खा. किरसान यांनी स्वत: हरनघाटला जाऊन महाराजांची भेट घेतली व त्यानंतर मंदिर परिसरात तातडीने पाहणी केली.

या दौऱ्यात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी डॉ. अरुण मलिक, नीरज तिवारी, शुभम कोरे यांच्यासह नायब तहसीलदार कावळे आणि स्थानिक प्रशासन, ग्रामसेवक, महसूल कर्मचारी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खा.डॉ. किरसान यांनी या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला असून, काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव

 

“ग्रामपंचायतीला कुलूप, विकासाला खो”

 

Comments are closed.