Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थ्यांनी घेतली नायलॅान मांजा न वापरण्याची शपथ

जिल्ह्यातील चार हजार पेक्षा जास्त शाळांमध्ये आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर 10 , जानेवारी :- नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या चार हजार पेक्षा जास्त शाळांमध्ये आज नायलॅान मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर व ग्रामीण भागातील ४१०० शाळांमध्ये आज नायलॉन मांजा वापरणार नसल्याची शपथ मुलांनी घेतली. जिल्हास्तरावर नायलॅान मांजा विरोधी अभियान जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना करण्यात आले. मकर संक्रांतीचा सण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी व विक्री केली जाते. हा मांजा नायलॅान धाग्यापासून तयार करण्यात येतो त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे हा मांजा सहजा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो त्यामुळे पक्षी या मांज्यात अडकून जखमी होतात. हा मांजा नागरिकांसाठी देखील धोकादायक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.