“नागपंखी सौंदर्यनी अवतरलं जगातील सर्वात मोठं ‘ॲटलस मॉथ’ फुलपाखरू”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सातारा:जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले “ॲटलास मॉथ” (पतंग) जातीचे फुलपाखरू जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारालगत आढळून आले आहे. दक्षिण पूर्व आशियात आढळणारे हे फुलपाखरू सह्याद्रीत आढळल्याने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आला आहे.
पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असलेले ‘ॲटलॉस मॉथ’ हे दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले आहे. या अतिदुर्मिळ फुलपाखराच्या दर्शनाने सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.