Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिक येथे हजारो शेतकऱ्यांनी अदानी, अंबानी यांच्या फोटोंचे दहन करून व्यक्त केला संताप!

दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्यापैकी 33 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काल सोमवारी नाशिक वरून दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले आहे.

प्रथमेश साळी – नाशिक, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिक, २२ डिसेंबर: केंद्र सरकारनी आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 25 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्यापैकी 33 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे कायदे शेतकऱ्यांसाठी नाही तर उद्योगपती, भांडवलदारांच्या फायद्याचे आहे असा आरोप करत महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काल सोमवारी नाशिक वरून दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे सरकार उद्योगपतींचे धार्जिणे असल्याने अदानी, अंबानी यांच्या फोटोंचे दहन करून यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. तर या आंदोलनात प्राण गमावलेल्या 33 शेतकऱ्यांना 2 मिनिटांचे मौन पळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

नाशिक च्या गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांनी व अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत दिल्लीकडे कूच केले.

राज्यभरातून नाशिकमध्ये जमलेल्या या शेतकरी मोर्चाला काँग्रेसच्या माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे संगिनी महिला संघटनेच्या अनिता पगार छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशिकांत उनवणे, आप’ चे योगेश कापसे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दिला. आंदोलकांनी मोदी शासन होश में आओ,मोदी शासन होश मे आओ, हम अपना अधिकार मांगते, कौन बनाया हिंदुस्तान-इस देश के मजदूर किसान, काला कानून वापस लेंगे- जितेंगे, किसान, इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी झालेल्या सभेमध्ये केरळ चे खासदार के के राजेश, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, नरसय्या आडाम, जे पी गावीत, सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी एल कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सचिव अजित नवले, राजू देसले आदी विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

Comments are closed.