Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदियात कोरोना लसीकरणाला सुरूवात पहिल्या दिवशी तिनशे आरोग्य कर्मचाऱ्यांं ना देणार लस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि . १६ जानेवारी: संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यात देखील आज कोरोना लसिकरणाला सुरवात झाली असुन पहिल्या टप्प्यात आज गोंदिया जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि देवरी उपजिल्हा रुग्णालयात दर दिवासी १०० लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

आज गोंदीया जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ३५ वर्षे सेवा देणाऱ्या डॉक्टर राजेन्द्र याना पहिली लस देण्यात आली आहे तर दुसरी लस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशात तुरकर याना देण्यात आले आहे. यानंतर आरोग्य विभातील लोकांना हे लसीकरण करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.