Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

TICCI च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार

आम. डॉ. देवराव  होळी, नागपूर येथील आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  21 ऑक्टोबर :-  आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमातून आदिवासी बांधवांना मोठे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र (टिक्कीच्या) माध्यमातून आदिवासीं बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आम. डॉ. देवराव  होळी यांनी आदिवासी उद्योगजगता विकास कार्यक्रमाच्या नागपूर येथिल कार्यक्रमात केले.

अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास यांच्या विशेष सहकार्यातून आदिवासी उद्योगजगता विकास कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथील साई सभागृहामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला आम. डॉ. देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मंचावर गजानन भलावी अध्यक्ष ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज महाराष्ट्र,  रवींद्र ठाकरे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर,   पार्लेवार संचालक एम एस एम इ, विशाल अग्रवाल अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन नागपूर, गजेंद्र भारती उद्योग सहसंचालक उद्योग भवन नागपूर यांचे सह विविध पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या धरतीवर ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची निर्मिती झालेली असून त्यातून आदिवासी उद्योजक बांधवांना चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे आपण टिक्कीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

वनविभागाची परवानगी घेउन लवकरच होणार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सुरूवात

Comments are closed.