Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनरेगा रद्द करण्याचा डाव हाणून पाडा

आरमोरीत माकपचे तीव्र निदर्शने देशव्यापी आंदोलनात शेतमजूर संघटनांचा सक्रिय सहभाग

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. २२ डिसेंबर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कथित निर्णयाविरोधात आज देशभरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून गडचिरोली जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने आरमोरी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनात शेतमजूर, भूमिहीन कामगार, कष्टकरी महिला आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सन २००५ मध्ये लागू झालेल्या मनरेगा कायद्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी किमान १०० दिवसांचे रोजगार मिळण्याची कायदेशीर हमी मिळाली. काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली होती. डाव्या पक्षांच्या निर्णायक दबावातून हा कायदा अस्तित्वात आला असून, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला, स्थलांतराला आळा बसला आणि शेतमजुरांना किमान उत्पन्नाची सुरक्षितता मिळाली, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र २०१४ नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुरुवातीपासूनच मनरेगाबाबत उदासीन व विरोधी भूमिका घेतली. आता कायद्याचे नाव बदलण्याच्या आडून प्रत्यक्षात मनरेगाच संपवण्याचा डाव सुरू असून, नव्या प्रस्तावित विधेयकात तब्बल ४० टक्के बजेट कपातीची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ पहिल्याच टप्प्यात ४० टक्के रोजगार हमी संपवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शेतमजूर संघटनांनी केला.

आज कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना, रोजगार हमीसाठी राज्यांकडून अतिरिक्त निधी अपेक्षित ठेवणे व्यवहार्य नाही. त्यामुळे हा भार थेट गरीब मजुरांवर टाकण्याचा हा सरकारचा डाव असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या पार्श्वभूमीवर शेतमजूर युनियनच्या वतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. आरमोरी येथील आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार यांनी केले. आंदोलनात कॉम्रेड अर्चना मारकवार यांच्यासह लिलाधर मेश्राम, मुनेश्वरी मारोती खरकाटे, मुरलीधर सखारामजी दोनाडकर, रेवता मुरलीधर दोनाडकर, नानाजी कान्ह धोटे, मिना चंद्रशेखर तितीरमारे, सुलोचना दसरथ तितीरमारे, गिता मुरलीधर भोयर, भावना रत्नाकर भोयर, अर्चना राजेंद्र अतकरे, राजेंद्र दादाजी अतकरे, नरेश फाल्गुन दोनाडकर, नलुताई नरेश दोनाडकर, कल्पना शामराव नन्नावरे, पसंता कालीदास माने, शंकर वंगण मेश्राम, सुमन पुंडलिक दहिकर, गिता दिपाजी दोनाडकर, दिपाजी नामदेव दोनाडकर यांच्यासह अनेक शेतमजूर व कष्टकरी सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.