Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मूल-चंद्रपूर मार्गावर वाघोबाची ऐट; प्रवाशांत भीती

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

https://youtube.com/shorts/apPVpGtecOw?feature=share

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मूल : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-चंद्रपूर मार्गावर आज सकाळी प्रवाशांना अक्षरशः थरार अनुभवावा लागला. केसलाघाट येथील हनुमान मंदिर, केसलाघाटपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला ऐटीत बसलेला वाघ वाहनचालकांना दिसून आला. अचानक समोर आलेल्या या वनराजामुळे काही काळ वाहतूक मंदावली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघ काही वेळ रस्त्यालगत शांतपणे बसून परिसरावर नजर ठेवून होता. वाहनचालकांनी तत्काळ वेग कमी करत सुरक्षित अंतर राखले. काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केले.

माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत गस्त वाढवली आहे. संबंधित परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांची हालचाल वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी न करता, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या लक्षणीय असल्याने अशा घटना अधूनमधून घडत असतात; मात्र सकाळच्या व्यस्त वेळेत वाघ प्रत्यक्ष रस्त्यालगत दिसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.