Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य पोलीस दलातील आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

पुण्याचे दिगंबर प्रधान मुंबई तर विनय राठोडची छत्रपती संभाजीनगरात बदली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 8 ऑगस्ट – राज्य पोलीस दलातील सोळा आयपीएस अधिकार्‍यांची मंगळवारी बदली झाली असताना बुधवारी पुन्हा आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने जारी केले आहे. त्यात पुण्याचे दिगंबर प्रधान यांची मुंबईत तर ठाण्याचे विनयकुमार राठोड यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे.

मंगळवारी गृहविभागाने सोळा पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्यानंतर बुधवारी पुन्हा आठ पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. गृहविभागाचे व्यकंटेश भट यांनी या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात पुण्याचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांची लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, ठाण्याचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांची छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षक, अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची बीडच्या पोलीस अधिक्षक, नांदेडचे अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांची नांदेडच्या पोलीस अधिक्षक, पुण्याचे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाचे पोलीस अधिक्षक-दक्षता अधिकारी दिगंबर प्रधान यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्त, ठाण्याचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांची ठाण्यात, मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांची राज्याचे नियोजन व समन्वय विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, नांदेडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे, गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांची पुण्याच्या पोलीस उपायुक्त, नागपूरचे पोलीस उपायुक्त गोरख सुरेश भामरे यांची गोंदियाच्या पोलीस अधिक्षक, नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चारचे समादेशक प्रियंका नारनवरे यांची नागपूरच्या लोहमार्ग पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच आयपीएस अधिकारी मनिष कलवानिया, श्रीकृष्ण कोकाटे, नंदकुमार ठाकूर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.