आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 3 ऑक्टोंबर : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 7 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 8 वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा.चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन. दुपारी 12.30 वा. मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.
Comments are closed.