Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क दि.०९ फेब्रुवारी :- “थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला. कुष्ठरुग्णांच्या जखमांवर उपचार करताना, त्यांच्या पुनर्वसनाचं काम केलं. कुष्ठरुग्णांना समाजात पूर्वीचं स्थान, सन्मान, प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिली. आदरणीय बाबा आमटे हे सुधारणावादी, पर्यावरणवादी, कृतीशील विचारवंत होते. महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढणारे ‘अभय साधक’ होते. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता राखण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचं स्मरण करुन आदरांजली वाहिली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.