Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात पलटला ट्रक, तीन जण जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. ५ मार्च: भरधाव वेगात असलेला ट्रक समोरून येणाऱ्या सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला पलटला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले यातील एक जण अजूनही कॅबिनमध्ये अडकून पडला आहे. त्याला जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा अपघात शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास कुरखेडा वैरागड मार्गावर घाटी गावाजवळ घडला. 

        रायपूर येथून लोखंडी पाईप घेऊन हैद्राबादकडे जाणाऱ्या ट्रकचा घाटी जवळ एका सायकलस्वारास वाचविताना अपघात झाला यामध्ये सायकलस्वाराचे दैव बलवत्तर म्हणून बचावले यामध्ये सायकल ट्रक खाली दबल्या गेली तर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटला यात ट्रकचा वाहक व क्लीनर कॅबिनमध्ये अडकून पडले जेसीबीच्या मदतीने जखमींना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.