Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काटलीतील चार जीव घेणारा ट्रकचालक ४८ तासांत गजाआड

काटली अपघातातील मुख्य आरोपी ट्रक चालक गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून अत्यंत गंभीर गुन्ह्याचा आव्हानात्मक तपास पोलिसांनी करून शोधमोहीम यशस्वी केली..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील काटली येथे चार निरपराध मुलांचा बळी घेणाऱ्या भीषण अपघातातील मुख्य आरोपी ट्रकचालकाला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गजाआड केले. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सिसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालांच्या आधारे ही कारवाई गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडपर्यंत पाठलाग करत पार पाडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटना ७ ऑगस्टच्या पहाटे घडली. काटली–नगरी फाटा रस्त्यावर व्यायामासाठी गेलेल्या सहा मुलांना भरधाव ट्रकने चिरडले. यात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलांनी उपचारादरम्यान प्राण गमावले. उर्वरित दोघांना हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या भीषण घटनेनंतर गडचिरोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीरतेचा विचार करून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच स्वतंत्र तपास पथके तयार झाली. केवळ ४८ तासांच्या अथक तपासानंतर गुन्ह्यातील ट्रक छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे — प्रविण बाळकृष्ण कोल्हे (२६, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया) आणि सहचालक सुनिल श्रीराम मारगाये (४७, रा. चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया). दोघांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोनि. विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे आणि त्यांच्या पथकांनी पार पाडली.

गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळवणाऱ्या या अपघातातील आरोपींची जलद अटक गडचिरोली पोलिसांच्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि समन्वयक्षमतेचे द्योतक ठरली आहे.

टिप्परने चार अल्पवयीन मुलांना चिरडल्याने मृत्यू; दोन किरकोळ जखमी..

 

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची भीषण धडक; आठ वर्षीय शौर्यचा जागीच मृत्यू, वडिलांचा हात-पाय मोडला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.