Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात भारतीय इतिहास लेखन:मध्य प्रांतातील जनजातीय योगदान या विषयावर दोन दिवसीय जनजातीय गौरव राष्ट्रीय परिसंवाद*

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात भारताच्या इतिहासात मध्य प्रांतातील जनजातींच्या योगदानावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय इतिहास लेखन :मध्य प्रांतातील जनजातीय योगदान” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन दि. ५ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठ, नवीन सभागृह येथे करण्यात येत आहे.

जनजातीय नायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित या परिसंवादाचा उद्देश भारताच्या इतिहासात मध्यप्रांतातील जनजातींच्या योगदानावर प्रकाश टाकणे हा आहे. या परिसंवादाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग व आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता उद्घाटन सोहळा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्या शाखा डॉ. श्याम खंडारे यांची उपस्थितीत पार पडणार आहे. या परिसंवाद करिता प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री जगेश्वर यादव, जनजातीय कार्यकर्ते व प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, रवीशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर, वैभव सुरंगे, युवाप्रमुख, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, दिल्ली, डॉ. चित्तारंजन भोई, भुवनेश्वर, ओडिशा, डॉ. श्याम कोरेटी, अधिष्ठाता,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपुर व डॉ. देवाजी तोफा, जनजातीय कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन लाभणार असुन बिरसामुंडा व भारतीय इतिहास लेखन,मध्यप्रांतातील जनजातीय योगदान,भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या जडणघडणीत बीरहोर ( छत्तीसगड) जनजातीययोगदान व आदिवासी संशोधन क्षेत्रातील मान्यवराचे संशोधन पेपर सादरीकरण असे विविध विषयावर दोन दिवस सत्रे व चर्चासत्राचे आयोजन होणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा परिसंवाद जनजातीय अभ्यास क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी, संशोधक, शैक्षणिक तज्ज्ञ आणि जनजातीय इतिहास लेखन संशोधनाच्या दृष्टिने महत्वाचे ठरणार असल्याने परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन परिसंवाद समन्वयक प्रा.विवेक जोशी, इंग्रजी विभाग प्रमुख व डॉ.वैभव मसराम, समन्वयक आदिवासी अध्यासन केद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.