Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस – नक्षल चकमकित दोन महिला माओवादी ठार, एके–47 व पिस्तूल जप्त

एटापल्लीच्या मोडस्के जंगलातील घटना..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली: पोलिसांच्या अचूक गुप्त माहिती, धाडसी रणनिती आणि वेगवान कारवाईमुळे माओवाद्यांच्या हिंसक महत्त्वाकांक्षेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम मौजा मोडस्के जंगल परिसरात लपून बसलेल्या गट्टा दलमच्या माओवादी तुकडीवर मंगळवारी (१७ सप्टेंबर) पहाटे पोलिस व सीआरपीएफ दलाने केलेल्या अचूक सर्च ऑपरेशनमध्ये दोन महिला माओवादी ठार पडल्या, तर एके–४७ रायफल, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि प्रचंड प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विश्वसनीय गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गट्टा दलमचे काही सक्रिय माओवादी मोडस्के जंगलात दबा धरून बसले असल्याची खबर मिळताच अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली C–60 च्या पाच पथकांना तातडीने कारवाईसाठी रवाना करण्यात आले. अहेरीहून निघालेल्या या विशेष कमांडो पथकांनी स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ १९१ बटालियनच्या ई कंपनीसोबत समन्वय साधून शत्रूला कोणताही मागचा रस्ता न ठेवता संपूर्ण परिसराची घेराबंदी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अचूक डावपेचाने माओवादी बचावाच्या सर्व वाटा बंद झाल्या. सकाळच्या धुक्यात सुरू झालेल्या शोधमोहीमेदरम्यान माओवादी दलाने पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. मात्र गडचिरोली पोलिसांच्या C–60 कमांडोंनी अफलातून शौर्य, शिस्तबद्ध फायरिंग आणि प्रशिक्षित युद्धकौशल्य दाखवत क्षणात प्रत्युत्तर दिले. या भीषण चकमकीत दोन महिला माओवादी ठार पडल्या, तर इतरांनी घनदाट जंगलाचा आडोसा घेत पळ काढला.

पुढील तासभर चाललेल्या तपासणीत पोलिसांनी मृतदेहासह एक स्वयंचलित एके–४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणात माओवादी प्रचार साहित्य हस्तगत केले. ही जप्ती माओवादी कारवायांच्या बळकट तळावर मोठा आघात मानली जात आहे. सध्या संपूर्ण परिसरात आणखी काही माओवादी दबा धरून बसल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने माओवादविरोधी अभियान अधिक तीव्रतेने सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.