Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज प्राप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, २५ जुलै – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत २ लाख ६५९ महिलांनी अर्ज सादर केले आहे. या योजनेसाठी ग्रामीण भागातून १ लाख ७९ हजार ७३१ तर शहरी भागातून २० हजार ९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुकानिहाय अर्ज नोंदणीची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अहेरी-१०७०३, आरमोरी-११३१२, भामरागड-६६०५, चार्मोशी-३८००४, देसाईगंज-१२९३६, धानोरा-२२७८६, एटापल्ली-१६३७२, गडचिरोली-२९२४२, कोरची-९७४२, कुरखेडा-१६३१३, मुलचेरा-१२४११, सिरोंचा-१४२३३.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.