Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुण्यात काल रात्रीत दोन वेगवेगळ्या घटनांत हीट एन्ड रन प्रकरणात दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू

एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झालाय.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 07 जुले – पहिला अपघात पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावने दोन वाजता झालाय. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झालाय. या अपघातात समाधान कोळी या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यु झालाय तर पी सी शिंदे हे पोलिस कॉन्स्टेबल जखमी झालेत. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक मधे उपचार सुरू आहेत.

या दोघांना धडक देणारी पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार होती असं पोलिसांच म्हणणंय. या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरांच्या माध्यमातून पोलिस या वाहनचालकाचा शोध घेतायत. तर दुसर्या प्रकरणात पुण्यातील सी आय डी मधे काम करणारे पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने यांचा मृत्यू झालाय. सचिन माने हे पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागातुन दु चाकीवरुन निघाले असताना आज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झालाय.सचिन माने हे सी आय डी चे पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.