Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर

मायलेकांच्या समोर बापाला नेलं ओढत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वर्धा, दि. २७ मे :  वर्ध्यात कारंजा तालुक्यातील राहटी जंगल बिट मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमाला तीन वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नांदोरा येथील मुकुंद ढोके (५८) हे आज पत्नी मुलांसोबत जंगलात तेंदूपत्ता आणण्यासाठी गेले होते. वडील काही अंतरावर गेले असता त्यांच्यावर तीन वाघांनी हल्ला केला. वडील आवाज देऊनही येत नसल्याने मुलाने गावातील नागरिकांना बोलावून आणले. जंगलात पाहणी केली असता वाघ वडिलांना ओढत नेताना दिसले. यात मुकुंद ढोके यांचा जागीच मृत्यू झालाय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागचे अधिकारी, पोलीस प्रशासन पोहचून पंचनामा करण्यात आला. यावेळी तातडीचे एक लाखाची मदत मृतकाच्या नातेवाईकांना वनविभागकडून देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.