Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“लोकस्पर्श न्यूज” च्या यशस्वी वाटचालीची दोन वर्ष पुर्ण 

जनसामान्यांच्या हृदयात मिळवले स्थान..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

संपादकीय…

ओमप्रकाश चुनारकर, 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“स्पष्ट मत, ठाम भूमिका” हे ब्रीद घेऊन २५ ऑक्टोंबर २०२२ ला गडचिरोलीसह राज्यभरात लोकप्रिय झालेल्या ‘लोकस्पर्श न्यूज नेटवर्क’ ने  आज दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे. दोन वर्ष निर्विवादपणे कार्यरत राहून कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता, “लोकस्पर्श न्यूज नेटवर्क” ने दोन वर्षात चुकीचे काम करणार्‍यांचा खरपूस समाचारही घेतला आहे. खणखणीत बातम्या आणि रोखठोक भूमिकेमुळे अवघ्या दोन वर्षात ‘लोकस्पर्श न्यूज नेटवर्क’ ने गडचिरोलीसह राज्यभरात विश्वासर्हता मिळवली आहे. निष्पक्ष बातम्या, आकर्षक मांडणी, वैविध्यपूर्ण सदरे यांचा योग्य मेळ घातल्यामुळे“लोकस्पर्श न्यूज नेटवर्क” वाचकांच्या पसंतीस आलेला आहे. परखडपणा, पारदर्शकता आणि वाचकाभिमुखतेचा संगम साधणारे हे वेब पोर्टल राज्यभरातील वाचकांच्या हृदयात आपलेसे करण्यात यशस्वी ठरले आहे.

तसे पाहता गेली दोन वर्षे कोविड-१९ च्या वैश्विक महामारीशी सामना करण्यात गेली. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत आमच्या प्रतिनिधीने जीवावर उदार होत वार्तांकन केले. शहरासह जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि परदेशात कोरोना संसर्ग संबंधित इत्थंभूत वार्तांकन केले. कमी दिवसात वाचक वर्गाला या काळात केवळ घाबरवून न सोडता, त्यांच्या मनातील भीती कशी कमी करता येईल यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले व तशा वृत्तांकनावर भर दिला. कोरोनाकाळात “लोकस्पर्श न्यूज नेटवर्क” ने केलेल्या वार्तांकनाचे संपूर्ण राज्यभरातून ओळख निर्माण करुन वाचकांच्या हृदयात जागा निर्माण केली. शिवाय व्यवस्थेतील त्रुटी वेळोवेळी दाखवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला. एवढेच नव्हे तर जगभरातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे ऋण व्यक्त करणे गरजेचेच आहे. वाचकांच्या अपेक्षेनुरूप निष्पक्षपाती, निर्भीड आणि स्वतंत्र बाणा असलेले “लोकस्पर्श न्यूज नेटवर्क” यशस्वी झाल्याचे अगदी ठामपणे सांगता येईल. अर्थात काळानुरूप बदलाला अनुसरून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आम्ही तसूभरही कमी नाही. घडलेल्या घटनांचा तात्काळ लेखाजोखा वाचकांसमोर मांडणारी आमची “लोकस्पर्श न्यूज नेटवर्क” ची ‘ स्पष्ट मत, ठाम भूमिका’ ही Tagline ऑनलाईन बातमीपत्रातून व्यापक चर्चेचा भाग ठरतेय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली, पालघर जिल्ह्यासह राज्यभरातील ताज्या घडामोडी, बातम्या प्रसिद्ध करण्याचा अभिनव यशस्वी प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसे बघितले तर गडचिरोली जिल्हा हा निसर्गाने नटलेला असून भरभरून निसर्गाने खनिज साठा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीसह विविध जातीच्या झाडाने रान फुललेला असून जिल्ह्यातून वैनगंगा, गोदावरी प्राणहिता सह जिल्ह्यातून मोठ्- मोठ्या नद्या वाहत आहेत. मात्र सिंचनाची सोय पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा झालेला नाही. मेडीगड्डा प्रकल्पामुळे तेलंगणा राज्याचा फायदा झालेला आहे. आजही सिरोंचा तालुक्यातील २० ते २१ गावे पूर पीडित क्षेत्रात येत असून त्या गावांचे ना पुनर्वसन  ना शासनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने आजही उपेक्षित आहेत.

जिल्ह्यात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मुबलक जागा उपलब्ध आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, उद्योग, कृषी आणि समाजकारणात पाहिजे त्या प्रमाणात पुढारलेला नाही. लोकप्रतीनिधींनीही जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या मराठवाडा, कोकण भागातील आपल्या क्षेत्राच्या बाजू उचलुन धरतात. त्याच प्रमाणे गडचिरोलीत विकासासाठी धोरणात्मक पाऊल टाकण्यासाठी कटिबद्ध दिसून येत नसल्याने आदिवासी नक्षल बहुल मागासलेला जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाने  नक्षल्यांचे कंबरडे मोडले असल्याने नक्षली कारवायावर अंकुश मिळविण्यात पोलिसांना यश आलेलं दिसून येत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दि. २५ ऑक्टोंबर रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात जावून पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली एवढेच नव्हे तर पोलीस मदत केंद्राच्या भव्य दिव्य इमारतीचे शुभारंभ करून आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद करून विकास कामाला गती देणार असल्याचे कार्यक्रमात बोलून दाखविले आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली पासून अवघ्या ४५ किमी अंतरावर असलेल्या मुल शहरात बालपण घालवलं त्यानंतर ते नागपूर या ठिकाणी स्थायी झाले असले तरी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याने पालकमंत्री स्वीकारले असल्याने जनसामान्य माणसांच्या भुवया उंचावल्या असून विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकून त्या सोबतच गडचिरोली जिल्ह्याला विकासात्मक कामे करून गडचिरोली जिल्हाचे नाव अग्रेसर करण्याचा हेतू दिसून येत आहे. मात्र येणारा काळच विकास कामातून आणि दिलेल्या वचन नाम्यातून  स्पष्ट होईलच. सध्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असली तरी येथील जनता सुजाण झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात बहुचर्चित असलेला सुरजागड लोहप्रकल्प कभी खुशी कभी गम अशा स्थितीत सापडला आहे. एका बाजूला रोजगार दुसऱ्या बाजूला दळणवळणाची सोय लोह वाहतुकीमुळे खिळखिळी झाली असल्याने सामान्य माणसात रोष व्यक्त केला जात आहे. तर व्यापारी दृष्टिकोनातून बघितलं तर बेरोजगारापेक्षा उद्योगपतींनाच लाभ झाल्याचं दिसून येत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे चक्क दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

“लोकस्पर्श न्युज” चा पहिला वर्धापन दिन दिमाखात साजरा झाला होता. मात्र कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या मर्यादांमुळे आम्ही वर्वषभरापासून जाहीर कार्यक्रम करणे टाळले आहे. असे असले तरीही गेल्या दोन दिवसांपासून वाचकांचे आणि जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींचे शुभेच्छा संदेश सातत्याने येत आहेत. अनेकांनी वर्धापन दिनी कार्यालयात येऊन शुभेच्छा देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पुन:श्च एकदा यशस्वी द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो. भविष्यातील आमच्या वाटचालीत आपण सारे हातात हात घालून पारिवारिक सदस्य म्हणून सोबत राहाल, असा विश्वास व्यक्त करतो.

हे पण वाचा :-

Comments are closed.