Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उदयनराजेंचे आंब्याच्या झाडाखाली बसून ‘भीक मागो’ आंदोलन; लॉकडाउनला खासदारांचा तीव्र विरोध

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • खा. उदयनराजे भोसले आज साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊन विरोधात केले आंदोलन.
  • आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून थाळी घेऊन बसले फुटपाथवर.    

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सातारा, दि. १० एप्रिल:  शासनाच्या लॉकडाउन विरोधात खा. उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पोवई नाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात आज सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होते. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपाचे खा. उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलक्या कारभाराचाही निषेध व्यक्त केला.

विकेंड लॉकडाऊनला विरोध दर्शनवण्यासाठी साताराचे खा. उदयनराजे भोसले यांनी आज साता-यातील पोवईनाक्यावर झाडाखाली भिकमांगो आंदोलन केले. लॉकडाऊन मुळे दुकानदारांचे हाल होत आहेत. अनेकांच्या पोटाला अन्न नाही असे म्हणत उदयनराजेंनी हे आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसंची मात्र चांगलीच धावाधाव झाली. उदयनराजेंनी बसायला पोती आणि ताट घेऊन आले होते. या भिक मांगो आंदोलनात जमा झालेले पैसे त्यांनी जिल्हाधिकारी यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच अडवले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिका-यांना खाली बोलावून घेतले. त्यानंतर उदयनराजेंनी ताटलीमध्ये जमा झालेले सर्व पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिका-यांच्या ताब्यात दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.