Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खमनचेरूचे उपसरपंच म्हणून नितीन कोडापे यांची बिनविरोध निवड

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देवून केले स्वागत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत खमनचेरूच्या उपसरपंचपदी आविसचे नितीन कोडापे यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील उपसरपंच साईनाथ कुक्कुडकर यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार तपासाअंती कुक्कुडकर यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व् रद्द करण्यात आल्याने नव्याने उपसरपंचपदाची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत आविस चे नितीन कोडापे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याने जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छा देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी पीठासिन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार फारुख शेख व आत्राम यांनी बघितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जि. प. सदस्या सुनीता कुसनाके,  ग्राम पंचायत सरपंच शैलू मडावी, ग्राम पंचायत सचिव संध्या गेडाम, सदस्या शामा बारसागडे, जिवनकला आलाम, राजेश्री डोंगरे, कलावती कोडापे, प्रशांत गोडसेलवार, आदिंंची  उपस्थित होती.

 

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती : भदंत डॉ. चंद्रकीर्ती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

 

Comments are closed.