Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचात युरियाचा तुटवडा; शेतकरी काळाबाजाराच्या विळख्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: सिरोंचा तालुक्यात खरीप हंगाम सुरू असताना युरिया खताचा तीव्र तुटवडा व काळाबाजार शेतकऱ्यांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे केंद्र सरकारने ४५ किलोच्या पिशवीसाठी २६६ रुपये दर निश्चित केला असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून ३५० ते ५०० रुपये आकारले जात आहेत. त्यातच अनेक कृषी विक्रेते शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर महागडी खते घेण्यास भाग पाडत आहेत.

खत वितरणासाठी सुरु केलेल्या DBT प्रणाली मुळेही शेतकऱ्यांचे हाल वाढले आहेत कारण मोबाईल नेटवर्क नसल्याने POS मशीन काम करत नाही अनेक शेतकऱ्यांची नोंदणीही पूर्ण झालेली नाही त्यामुळे खत विक्रीची नोंद होत नाही आणि अधिकृत दरात खत मिळणे अशक्य झाले आहे परिणामी काळा बाजाराला खतपाणी मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खते ही आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत येतात त्यामुळे जास्त दरात विक्री करणे हा थेट कायदेशीर गुन्हा आहे मात्र सिरोंच्यात कुठलीही कठोर कारवाई न झाल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे

या समस्येवर काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन दिले असून मागणी केली आहे की मागास भागात तातडीने DBT नोंदणी पूर्ण करावी नेटवर्क नसलेल्या भागात ऑफलाईन मोड लागू करावा सहकारी सोसायट्यांतून थेट खत वितरण करावे आणि काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी तहसीलदारांनी निवेदन स्विकारून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल व त्याची जबाबदारी शासनावर राहील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.