Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे १८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

१८ वर्षांवरील व्यक्तींनी कोविन अँप वर नोंदणी करूनच लसीकरणास यावे – सरपंच शंकर मेश्राम यांचे आवाहन.

शंकर मेश्राम – सरपंच, ग्राम पंचायत आलापल्ली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली, दि. ५ मे: अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांत १८ वर्षावरील नागरिकांना कोविड-१९ लसीकरण सुरू करण्यात आले असून सर्व १८ वर्षाच्या वरील व्यक्तींनी कोविन अँप वर नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे असे आवाहन आलापल्ली सरपंच शंकर मेश्राम यांनी केले आहे. 

आरोग्यवर्धिनी केंद्र आलापल्ली येथे १८ वर्षांवरील लसीकरण मोहीम ४ मे रोजी सुरुवात झाली. मोहिमे प्रसंगी उपसरपंच विनोद आकंपल्लीवार,  वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्का उईके यांची उपस्थिती होती. आरोग्य कर्मचार्‍यांना कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावकर्‍यांनी १८ व  ४५ वर्षा वरील सर्वांनी न घाबरता लस घ्यावी असे आव्हान केले.   लसीकरण कार्यक्रमात युवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यांच्या उपस्थितीत सुरुवात करून आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व गावकर्‍यांनी १८ व ४५ वर्षा वरील सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन केले.

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?

    • इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं “Get OTP” या बटणावर क्लिक करा.
    • एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
    • ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
    • ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
    • सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.