Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तारापूर विद्यामंदिर येथे विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पालघर, 21 एप्रिल :जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर आणि तारापूर विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दिनांक 12 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत संपन्न होत आहे, सदर शिबिर आयोजनाचे तारापूर विद्यामंदिर चे हे सतरावे वर्ष आहे. सदर शिबिरात बारा खेळांच्या बाबतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जवळजवळ 280 खेळाडूंना या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी तारापूर विद्या मंदिरचे भव्य असे पटांगण व मैदान शाळेने उपलब्ध करून दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विविध खेळातील प्रशिक्षणा साठी पालघर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने व क्रीडा अधिकारी  प्रकाश वाघ यांनी दिनांक 12 एप्रिल रोजी सुरुवातीलाच मैदानावर भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फुटबॉल व्हॉलीबॉल, क्रिकेट स्केटिंग, कॅरम,चेस, बास्केटबॉल, आणि ॲथलेटिक्स मधील सर्व खेळांचा समावेश या क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर प्रशिक्षण शिबिरात बारा एन आय एस सर्टिफिकेट्स प्राप्त कोचेस व एमसीए लेवल one certificates प्राप्त कोचेस मार्गदर्शन करत आहेत.अशा या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्या सौ. जोन रोझारीओ यांनी केले. सदर प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्यांनी सांगितले की,आमची शाळा नेहमीच विद्यार्थ्याच्या सुप्त अशा कलागुणांना व क्रीडा गुणांना वाव देत आली आहे, आणि पुढे सुद्धा याच धोरणानुसार शाळेची वाटचाल चालू राहील.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.