Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडा तालुक्यातील गांवे बुडाली अंधारात!

Get real time updates directly on you device, subscribe now.

महावितरणने खंडित केला विद्युत पुरवठा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ मार्च: कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पथदिव्याचे वीज बिल जि. प. प्रशासनाने न भरल्यामुळे महावितरण तर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्याचे वीज पुरवठा कापण्याची मोहीम सुरू केली असल्याने संपूर्ण तालुका अंधारात गेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       ऐन सणासुदीच्या पर्वावर गावातील पथदिव्याचे वीज बिल न भरल्याच्या कारणावरून महावितरणने अनेक गावातील वीजपुरवठा खंडित केल्याने संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात अंधार पसरल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी संघटना कुरखेडाच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी, सभापती, उपसभापती पं. स. कुरखेडा यांना निवेदन देण्यात आले. संवर्ग विकास अधिकारी, सभापती उपस्थित नसल्यामुळे श्रीराम दुगा उपसभापती पं. स. कुरखेडा यांनी सदर निवेदन स्वीकारले.

याप्रसंगी गोठणगावचे उपसरपंच रामभाऊ लांजेवार, गेवर्धा येथील ग्रापसदस्य रोशन सय्यद सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, सदस्य हेमंत सिडाम अरततोंडीचे सरपंच विजय तुलावी, गुरणोलीच्या सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, चिखलीचे उपसरपंच वासुदेव बहेटवर, ओमप्रकाश बोगा उपसरपंच गेवर्धा, वासुदेव बहेटवार उपस्थित होते.   

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

    यावेळेस उपसभापती श्रीराम दुगा यांनी भ्रमणध्वनीद्वारे जि. प. आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.