अमित शहा यांच्या केलेल्या “त्या” वक्तव्याच्या विरोधात वंचितचे ईंदिरा गांधी चौकात तिव्र निदर्शने
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: देशाचे गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यामूळे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध करत गृहमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींनी घ्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिनेे ईंदिरा गांधी चौकात तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणा व ना-यामूळे ईंदिरा गांधी चौक परिसर दणाणून गेला होता.
गृहमंत्री शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने फॅशन म्हणून आंबेेडकर आंबेडकर असे नाव घेण्यापेक्षा देवाचे नांव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती, असे मनुवादी वक्तव्य केल्याने तमाम जगभरातील व देशातील डॉ आंबेडकर अनुयायांच्या भावना दु:खावल्यामूळे तिव्र संताप व्यक्त केला आहे.
देशाचे गृहमंत्री शहा हे जोपर्यंत आपल्या संविधानीक पदाचे राजीनामा देत नाही तो पर्यंत देशभरात तिव्र आंदोलने सूरूच राहणार आहेत. अशा बेजबाबदार गृह मंत्र्याला संविधानीक पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे पूर्व विदर्भ संयोजक बाळू टेंभुर्णे, रिपाईचे नेेते प्रा मुनिश्वर बोरकर, जेष्ठ नेते भरत येरमे, वंचितचे जेष्ठ नेते जी के बारसिंगे, बाळकृष्ण बांबोळे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, वंचित महिला आघाडीच्या जया रामटेके, जयश्री येरमे, कवडू दूधे, विलास केळझरकर, तुळशिराम हजारे, जया रामटेके, संदिप सहारे,धर्मेंद्र गोवर्धन, सिमा खोब्रागडे, लता शेंद्रे अशोक पेठकर,उपस्थित होते.
Comments are closed.