Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दौरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १२ :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे दि. १३ आणि १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आगमन व पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे समवेत सदिच्छा भेट. दुपारी २ ते ४.१५ भामरागड ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव येथे भेट व पाहणी करतील. सायंकाळी ७.३० वाजता शासकीय आश्रमशाळा गडचिरोली येथे आगमन व राखीव.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय येथे भेट व पाहणी. सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसोबत चर्चा. सकाळी ११.३० वाजता राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची बैठक. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपरी २.३० वाजता शोधग्राम (चातगाव) कडे प्रयाण. दुपारी ३.०० वाजता शोधग्राम (चातगाव) येथे पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे समवेत सदिच्छा भेट. सायंकाळी ४.३० ते ५.१५ प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला व उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे भेट व पाहणी. सायंकाही ५.३० वाजता नागभिड मार्गे नागपूरकडे प्रयाण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.