Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग सदस्य यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 14 मार्च :- गडचिरोली जिल्ह्यात बालकांबाबत काम करणाऱ्या विविध यंत्रणा यांना अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग,मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य मा. ऍड. संजय शेंगर व मा.चैतन्य पुरंदरे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन बाल सरंक्षण क्षेत्रातील शासकीय मुलांचे निरीक्षनगृह व बालगृह, सखी वन स्टॉप सेंटर, बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन 1098 गडचिरोली या सर्व यंत्रणांना भेट दिली.
महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोग सदस्य ऍड.मा. संजय शेंगर व मा.चैतन्य पुरंदरे यांनी सर्वप्रथम गडचिरोली जिल्हयातील बाल कल्याण समिती येथे भेट दिली व समिती सदस्यांसोबत कामकाजाविषयी काही प्रकरणावर चर्चा करून निर्देश दिले व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी वर्षा मनवर अध्यक्ष बा. क. स. गडचिरोली, ऍड राहुल नरुले,डॉ. संदीप लांजेवार,दिनेश बोरकुटे,  काशिनाथ देवगडे सदस्य बा. क. स. गडचिरोली उपस्थित होते. नंतर बालगृहाची पाहणी केली व काही सूचना केल्या व प्रवेशितंसोबत संवाद साधला. सखी वन स्टॉप सेंटर येथे भेट देऊन येथिल व्यवस्थेची पाहणी केली व कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. व गडचिरोली जिल्ह्यात एवढे सुंदर काम होऊ शकते हे सर्व राज्य भर राबविण्यात येईल असे वक्तव मा. सदस्य यांनी केले.

त्यानंतर महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथील जिल्हा बाल संरक्षण कक्षात बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, चाईल्ड लाईन 1098 , सखी वन स्टॉप सेंटर ,बाल पोलीस पथकातील अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कर्मचारी बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) कर्मचारी वर्ग यांची बैठक घेण्यात आली त्यात सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत ऍड. संजय शेंगर, मा.चैतन्य पुरंदरे व यांनी बाल हक्क आयोगाचे काम व बाल स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले..जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिल्हा बाल संरक्षण कक्ष. रुग्णालय इत्यादी ठिकाणे बालस्नेही करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.एका बालविवाह प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे पुष्पगुच्स्य देऊन अभिनंदन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर बैठकीचे नियोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकार , कवेश्वर लेनगुर ,प्रियंका आसुटकर सामाजीक कार्यकर्ता तनोज ढवगाये, माहिती विश्लेषक उज्वला नाकाडे, क्षेत्रकार्यकर्ता निलेश देशमुख,रवींद्र बंडावार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कवेश्वर लेनगुरे बाल संरक्षण अधिकारी यांनी केले तर जयंत जथाडे सामाजिक कार्यकर्ता यांनी सदर बैठकीत उपस्थितांचे आभार मानले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.