Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी पोलीस स्टेशनच्या अँटी चेंबरमध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली ही अत्यंत गंभीर बाब – विवेक पंडित

या घटनेतून पुन्हा एकदा राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उसगाव , २५ डिसेंबर: वसई तालुक्यातील तुळींज पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हणत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने पंडित यांनी ‘राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशीं’बाबत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि पोलीस महासंचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तपास करावा आणि राष्ट्रीय पोलीस आयोगाने सुचविलेल्या शिफारशी अमलात आणण्यासाठी फारच उशीर झाला आहे, त्या लवकरात लवकर अंमलात आणाव्यात अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी गुरुवारी पोलीस ठाण्याच्या अँटी चेंबरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही गंभीर बाब आहे. ते कोणत्यातरी मानसिक ताण तणावाखाली होते. पोलीस शिपाई म्हणून ज्या वेळेला दाखल होतो त्यावेळेला त्याच्या प्रमोशनचा, कामाच्या तासाचा प्रश्न तसेच इतर असंख्य अडचणी असतील, हे सर्व प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत त्यांच्या कामाचे तास हा विशेषता की ज्यामुळे मानसिक ताणाला पोलिसांना सामोरे जावे लागते. तेव्हा या निमित्ताने महाराष्ट्र पोलीसदल, विशेषत: गृहमंत्री आणि महासंचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने ने  पाहिले पाहिजे आणि याप्रकरणी योग्य तपास करावा. तसेच राष्ट्रीय पोलीस आयोगाने ज्या शिफारशी सुचविल्या होत्या त्या लवकरात लवकर अमलात आणाव्यात असेही विवेक पंडित म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.