Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ई-इपीकवर मिळणार मतदार ओळखपत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 04 फेब्रुवारी: भारत निवडणूक आयोगाने दिनांक २५ जानेवारी, २०२१ या ११ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी e-EPIC या सुविधेची सुरूवात केली आहे. २५ जानेवारी, २०२१ या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी काही नविन मतदारांनी नोंदणी करून त्यांनी NATIONAL VOTER’S SERVICES PORTAL (राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल) या मा. भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून आपले e-EPIC डाऊनलोड करून घेतले आहे.

मतदारांची मोठ्या प्रमाणात मागणी लक्षात घेता आणि या e-EPIC च्या प्रणालीवरील सातत्याने येत असलेला भार पहाता नविन नोंदणी झालेल्या मतदारांना यासाठी प्राधान्य देण्याचे आयोगाने ठरविले आहे. तद्नुषंगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ दरम्यान ज्या नविन मतदारांनी नोंदणी केली आहे त्या मतदारांना फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत वरील पोर्टलच्या सहाय्याने e-EPIC डाऊनलोड करता येऊ शकेल. तसेच मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ पुर्वी नोंदणी झालेल्या आणि योग्य दुरध्वनी क्रमांक नमूद केलेल्या इतर सर्वसाधारण मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्याचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे मा. भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. तरी सदरच्या मा. भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून e-EPIC सेवेचा लाभ सर्व नविन मतदारांनी घ्यावा असे आवाहन श्री दीपक सिंगला, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.