Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरिता नवी दिल्ली, पुदूच्चेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. 12:- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज मतपेटी, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर आज प्राप्त झाले. या सर्व साहित्याची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे.

येत्या 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरिता नवी दिल्ली, पुदूच्चेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य विधानभवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूम येथे पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.