लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, १३ मार्च :- पतीने रजेचा रितसर अर्ज देऊनही आगार प्रमुखाने नाकारल्याने सांगली जिल्हयातील आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगार प्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्व आटपाडी परिसरात मोठ्याने रंगली आहे .
विलास कदम हे गेल्या ३३ वर्षांपासून एसटीत वाहन चालक म्हणून कार्यरत असून येत्या ७० दिवसांत ते सेवानिवृत्त होणार आहेत आणि रुजू झाल्यापासून आजपर्यत सर्व रजा वागलता २७० दिवस रजा शिल्लक आहे.

याशिवाय पत्नी ही आजारी असल्याने उपचारासाठी बाहेर गावी रुग्णालयात घेऊन जावे लागत आसल्याने १२, १३ मार्च रोजी दोन दिवसासाठी ररजा मिळण्यासाठी आगार प्रमुखांकडे ६ मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र एसटी प्रशासनाने त्यांना सुट्टी नाकारत त्यादिवशी आटपाडी-इचलकरंजी येथे कर्तव्य बजावण्यासाठी पाठविण्यात आले.
त्यामूळे आधीच आजाराने ग्रस्त आणि त्यातही सुट्या उपलब्ध असूनही दिले नसल्याने रविवारी सकाळीच चालक कदम यांची पत्नी नलिनी कदम आटपाडी आगारामध्ये येवून आटपाडी एसटी आगारात त्यांनी पतीच्या रजेसाठी अधिकाऱ्याच्या दालनासमोर झोपून अनोखे आंदोलन केले.
आगार प्रमुख यांच्या दालनासमोर थेट अंथरून पांघरून टाकत आंदोलन सुरू केले. दरम्यान चालक कदम हे त्यांना दैंनदिनी प्रमाणे आटपाडी इचलकरंजी भागात कर्तव्य बदलण्यासाठी गेले होते..
हे पण वाचा :-


Comments are closed.