Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मातंग समाजाच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार – खा.रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 24 जानेवारी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा,मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या राज्यव्यापी परिषदेत जाहीर केले. मातंग समाजाच्या अडचणी आणि प्रमुख प्रश्न जाणून घेण्यासाठी मातंग समाजातील प्रमुख नेत्यांसह विविध संघटनाच्या प्रमुखा बरोबर आज पुण्यात राज्यव्यापी परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की मातंग समाजाचे काही प्रश्न हे राज्य सरकार च्या हातात आहेत त्यासाठी ही आपण राज्य सरकार बरोबर चर्चा करून हे प्रश सोडविणार असल्याचे म्हणाले. तसेच मातंग समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सहा वर्षे बंद आहे. ते लवकरच चालू करण्यासाठी आपण आग्रही रहाणार असल्याचे म्हणाले. यावेळी मातंग समाजाच्या मागण्याचे निवेदन खासदार रामदास आठवले यांना देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादीचे विजय डाकले यांनी प्रास्ताविक केले .माजी आमदार राम गुंडीले यांनी मातंग समाजातील तरुण बेरोजगार झाले तर ते गुन्हेगार होतील त्यामुळे बंद असलेले महामंडळ तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक प्रा.सुकुमार कांबळे यांनी आम्हाला न्याय न मिळाल्यास येत्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे बोलले. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य रवींद्र दळवी यांनी मातंग विकास विभाग वेगळा करावा अशी मागणी केली. यावेळी मातंग आयोगाचे माजी उपाध्यक्ष दिलीप आगळे यांनी आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या अशी मागणी केली.

अध्यक्षीय भाषणात हनुमंत साठे म्हणाले की मातंग समाजाला आज स्वतंत्र आरक्षण, समाजकल्याण मध्ये मातंग विकास विभाग वेगळा करावा, मातंग आयोगाच्या शिफारशी तसेच महामंडळ या गोष्टी समाजाच्या अत्यंत जिव्हाल्याच्या असून त्या आपण सोडवाव्या अशी मागणी आठवले यांच्याकडे केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वेळी माजी आमदार राम गुंडीले,प्रा.सुकुमार कांबळे सांगली ,मातंग आयोगाचे माजी उपाध्यक्ष दिलीप आगळे लातूर, प्रा.मिलिंद आव्हाड JNUI दिल्ली, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सद्यस्य रवींद्र दळवी ,राष्ट्रवादी चे नेते सुभाष जगताप, नगरसेवक, अविनाश बागवे, एन.एस.यु.आय चे माजी प्रदेशादयक्ष मनोज कांबळे, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, अनिल हातागले, आण्णा वायदंडे, आनंद वैराट,नंदकुमार साठे, रघुनाथ बाबर सातारा, संदीपान झोम्बाडे यांनी समाजाच्या प्रमुख मागण्या यावेळी सांगितल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.