Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची हजेरी, वीज पडून महिलेचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. २५ एप्रिल: सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

सायंकाळनंतर जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळ नंतर जत तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पावसाने विठ्ठल नगर याठिकाणी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या तुळसाबाई यशवंत डोंबाळे (५०) या महिलेच्या अंगावर वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर सायंकाळ नंतर सांगली शहरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.