Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलांनी प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे – खा. अशोक नेते

Get real time updates directly on you device, subscribe now.

खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 27 जानेवारी : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे की या देशाला नंबर 1 चा देश बनवायचे आहे त्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर सुजलाम सुफलाम झाले पाहिजे त्यासाठी पावले उचलुन नवनवीन योजना अंमलात आणल्या तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी कौशल्य विकास योजना अंमलात आणली व त्याद्वारे युवक-युवतींना विविध प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आदरणीय पंतप्रधानांनी केलेला आहे. व त्याच अनुषंगाने कौशल्य विकास योजनेतून महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे याचा लाभ घेऊन महिलांनी लघु उद्योग उभारून स्वतः व आपल्या कुटुंबाला आत्मनिर्भर करावे असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले. प्रशिक्षण केंद्र च्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा प्रसिद्धी प्रशिक्षण केंद्र धानोरा च्या संयुक्त विद्यमाने धानोरा येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0  फेज च्या निःशुल्क प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ आज गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष  लीनाताई साळवे होत्या. सहउदघाटक म्हणून सहआयुक्त प्रविण खंडारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, महिला आघाडी च्या माजी जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, शंभूविधी गेडाम, गडचिरोली नगर पंचायतच्या नगरसेविका रंजनाताई गेडाम उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.