Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन उत्साहात साजरा .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुलचेरा, 13,ऑक्टोबर :- १३ ऑक्टोबर हा दिवस “जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण वा जोखीम कपात वा घट दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हा दिवस तहसील कार्यालय मुलचेरा येथे तहसीलदार मा. कपिल हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजीं सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढून साजरा करण्यात आला.

आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. वादळे, भूकंप, अतिवृष्टी, आग इ. नैसर्गिक तर युद्ध, दहशतवादी हल्ले, दंगली इ. मानवनिर्मित आपत्ती आहेत आणि आपण सर्व मिळून समाजाला मदत केली पाहिजे असे आवाहन मा कपिल हटकर तहसीलदार यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेव योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गौतम वाणी यांनी केलेे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रणजीत मंडल् यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील १०० विद्यार्थी शिक्षक डॉ शनवारे डॉ बाचेर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठाकरे गटाचा प्लॅन – बी तयार !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.