Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील 2 हजार 655 अमृत सरोवराच्या ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 20 जून –  स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवराची निर्मीती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 2 हजार 655 अमृत सरोवर निर्माण झाले आहे. रात्यातील या अमृत सरोवराच्या स्थळी बुधवार दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. जागतिक योग दिनाच्या राष्ट्रिय कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. प्रधानमंत्री यांनी युनोच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक स्थरावर योगा दिवस म्हणून साजरा करावा अशी संकल्पना मांडली होती त्यानुसार युनोने 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे भारतीय योगा पध्दती जागतिक स्थरावर पोहचण्यास मदत झाली आहे. जागतिक योग दिवस संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केंद्र शासनाने केले आहे.

यावर्षीची थीम ‘वसुधैव कुटूंबकम’ ही असून दिनांक 21 जून 2023 रोजी राज्याच्यावतीने अमृत सरोवराच्या स्थळी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवा निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवराच्या निर्मीती पेक्षाही राज्यास दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त अमृत सरोवराचे निर्मीती झाली आहे. हा परिसर पर्यावरण दृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, प्रसन्न असल्यामुळे योग साधना करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हा परिसर निसर्ग व आध्यात्मिक एकरुपतेचे उत्तम प्रतिक असल्यामुळे आंतरराष्ट्रिय योग दिवस येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा स्तरावरुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

योग दिनाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक गावाच्या शाळेतील योग व क्रिडा शिक्षकांच्या मदतीने, आशा सेवीका, एएनएम, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सभासद, भजन मंडळ, ग्रामसेवक, गावातील परिसरातील नागरिकांच्या सहभागाने योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट विकास अधिकारी व तहसिलदार यांना सुचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची छायाचित्र http://mahaegs.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पाठविण्यात यावे असे आवाहन महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र चे आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.