Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृती जपावी – खासदार अशोक नेते

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 8 जून- नेहरू युवा केंद्र, गडचिरोली युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित युवा उत्सव २०२३ कृषी महाविद्यालय गडचिरोली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते पार पडला. या समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना, युवकांनी अशा कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव देत आपल्या संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमातून युवकांनी व्यक्तिमत्व विकास करावा असेही आवाहन त्यांनी केले. विजय, पराजय, होणे सहाजिकच आहे,जे स्पर्धक विजय झाले त्यांचा अभिनंदन व जे स्पर्धकांना अपयश आले त्यांनी खचून न जाता पुढे प्रयत्न करावे. चांगला कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित केल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे अभिनंदन केले.

सामूहिक नृत्य, भाषण, चित्रकला, कविता, फोटोग्राफी अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धाचे बक्षीस वितरण खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते पार पडले. सामूहिक नृत्य तसेच भाषण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक साहील रामटेके, द्वितीय पारितोषिक आदिती बंडावार, तृतीय पारितोषिक अरबाज शेख यांना वितरीत करण्यात आले. नृत्य स्पर्धेत अनुप मांझी यांना प्रथम, एसआर स्टार गट व्दीतीय व नालंदा डान्स ग्रुप यांना तृतीय पुरस्कार मिळाला. कविता स्पर्धेत भारत मेश्राम हे प्रथम आले. चित्रकला स्पर्धेत पुजा दुपारे तर छायाचित्र स्पर्धेत प्रसनजित सहारे प्रथम आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सर्व सहभागींना प्रमाणपत्र व विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील २ विजेते आणि भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रथम विजेते यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते गडचिरोली यांच्यासह चांगदेव फाये, आमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी गडचिरोली, डॉ.शांती पाटील सहयोगी प्राध्यापिका कृषी महाविद्यालय गडचिरोली, विवेक कहाळे जिल्हा संघटक, भारत स्काऊट गाईड, मनोहर हेपट, भास्कर मेश्राम, मनीषा मडावी, युवा मोर्चाचे उल्हास देशमुख, तसेच मोठ्या संख्येने युवा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते युवा उत्सवाचे उद्घाटन – सकाळी कार्यक्रमाला सुरूवात होताना प्र.जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिपप्रज्वलन करून व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहायक प्रा.शांती पाटील, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, भास्कर मेश्राम, मनोहर हेपट, डॉ.सविता सादमवार, डॉ.शुभांगी परशुरामकर, मनिषा मडावी, विवेक कहाळे, प्रतिभा रामटेके, संध्या येलेकर उपस्थित होते. यावेळी धनाजी पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले तसेच समाज बदलासाठी युवकांमधे जास्त संकल्पना असतात असेही मत व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.